IT CONCEPTS: June 2021

Saturday, June 12, 2021

मराठी विचार

विचारांचा गोंधळ चालू झाला की समजून जायचं आपण नात्यांना व माणसांना जास्त वेळ देतोय.
ज्याला आपल्या आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव असते ना,ती कधीच वाईट मार्गाने जात नाहीत.

---

स्वतःच कर्तृत्व सिद्ध करायचं असेल तर,आई वडिलांच्या सुरक्षतेच्या छपराखालून वेगळं व्हावंच लागत.

---

कधी कोणाकडून अपेक्षा ठेवू नका,कारण अपेक्षा पूर्ण झाल्यानाहीत तर त्या अपेक्ष्यांच ओझं डोळ्यातून नक्की ओघळतं.

---

मुलगी होण सोपं नसत,तिच्यात वडिलांची स्वप्न एकवटलेली असतात,आईची प्रचिती असते,भावासाठी आपुलकी असते,बहिणीसाठीची सखी असते,व भविष्यातील एका घरातील वंश वाढवणारी ओळख असते.

---

कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असून,प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे,कोरोना वरील लस घेऊन कोरोनाला दूर ठेवूया व आपल्या कुटुंबालाही सुरक्षित करूया..!

---

कधीही दुसऱ्याला दोष देण्याऐवजी स्वतःची पातळी, योग्यता व चूक यावर विचार केला तर परत पश्चाताप करून घेण्याची वेळ येत नाही.

---

दुसऱ्याला काही दिल्याने किंवा दुसऱ्याला काही मदत केल्याने स्वतःजवळील काही खर्च होत असेल तर तो आहे स्वतःचा "मीपणा"..

---

एखाद्याबद्दल चांगूलपणा जरा जास्त प्रमाणात दाखवलात, तर त्या व्यक्तीच्या नजरेत तूमची किंमत कमी होण्यासाठी वेळ लागत नाही.

---

आपणाला जर एखाद्याला मदत करायला जमत नसेल तर त्याच्या सध्याच्या परिस्थितीवर व वेळेवर भाष्य करणे हे निष्ठुरतेचे लक्षण बोलणेच योग्य ठरेल.

--

एखाद्यासाठी गरजेपेक्षा जास्त चांगले बनालात तर तो व्यक्ती नक्कीच तूमचा गरजेपेक्षा जास्त वापर करून घेतो.

---

माणूस कोणताही आनंदाचा क्षण स्वतःसाठी जगत नाही, तो जगतो फक्त व्हाट्सअप मध्ये स्टेटस ठेवण्यासाठी..

---

पूर्ण विराम हा वाक्याच्या शेवटी दिला तरच त्या वाक्याला अर्थ असतो,त्याचप्रमाने लोकांशी बोलताना स्वल्पविराम व पूर्ण विराम कधी देऊन आपलं बोलणं संपवायचं हे समजलं तरच,आपल्या बोलण्याला अर्थ राहतो..

---

आयुष्य जगणं खूप कठीण आहे,पण फक्त बसून त्या अडचणींवर विचार करून मार्ग निघणार नाही,त्यामुळे प्रयत्न करत चला,कदाचित कठीण मार्ग सुद्धा सोपे होत जातील..

---

लहानपण व मोठेपण यात इतकाच फरक आहे आहे की लहानपणी आपण आपल्या खेळण्यांशी खेळत असतो व मोठ्यापणी आपण आपल्या विचारांशी खेळत असतो..

---

कधी कधी अंधारात सोबत असणारा काजवा सुद्धा उजेडात सोबत असणाऱ्या सूर्या पेक्षा जास्त मोलाचा वाटतो..

---

समुद्र अथांग असूनही त्याच्या खाऱ्या पाण्यामुळे त्या समुद्राला किंमत राहत नाही,तसेच तुमच्याकडे कितीही पैसा असला तरीही जर तुमच्यात माणुसकी नसेल तर एक चांगला माणूस म्हणूनही तुम्हाला समाजात किंमत राहत नाही.

---

प्रत्येक वेळी चूकच कारणीभूत नसते,काही नाती अहंकार व मीपणा जास्त बाळगल्यामूळेही तूटतात.

---

जगासमोर स्वतःला आहे तसेच मांडाव थोड्यावेळाचा देखावा हा तुम्हाला बाहेरून सुंदर बनवेल पण आतून नाही.
-----
आपण झोपेच्या आधी ज्या व्यक्तीचा विचार करतो,तोच व्यक्ती आपल्या दुःख किंवा आनंदाचे कारण असतो.

---

आपल्यापैकी खूपसारे जण आनंदी होण्यास घाबरतात, कारण त्यांना असे वाटते की मी जर का हा आनंद अनुभवला तर पुढच्या क्षणीच काहीतरी वाईट घडेल.

---------

लोकांशी वागताना अस वागा की आपले प्रोफाइल पुढच्याने ब्लॉक करण्याऐवजी सर्च केले पाहिजे.

--

येणाऱ्या पिढीचे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी, आपण आपला आज त्यांच्यासाठी खर्च करयला हवा.